पुणे जिल्हा: लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

शिरुर : तालुक्यातील आमदाबाद येथील एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिपक निंबा सूर्यवंशी (रा. मेशी, ता. देवळा, जि. नाशिक) याच्या विरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद येथील विवाहित महिलेची एका व्यवसायाच्या माध्यमातून दिपक याच्यासोबत ओळख झाली होती. दरम्यान दिपक याने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार सुरु ठेवले, मात्र पिडीतेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीतेने शिरुर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिपक निंबा सूर्यवंशी (रा. मेशी, ता. देवळा, जि. नाशिक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर हे करत आहे.





