पुणे जिल्हा : अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी विठूरायाला अभिषेक

चिंबळी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून श्री विठ्ठलाच्या चरणी अभिषेक, महापूजा केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या यामध्ये महायुतीला बहुमत मिळून सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तीन पक्ष एकत्र येऊन तसेच युती मधील घटक पक्षांचे हे यश आहे; परंतु आता सर्वांपुढे आता प्रश्न पडला आहे मुख्यमंत्री कोण होणार, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घेत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची वर्णी लागावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांनी साकडे घातले. कार्तिकी उत्पत्ती एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथून तुळशीहार, विना, शाल,
पगडी आणून मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा सन्मान केला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, युवकांचे नेते अतिश बारणे आदीं सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





