पुणे जिल्हा : खरा वंशाचा दिवा ही मुलगीच

सारिका भरणे : अशोकनगर गणेशोत्सवात होम मिनिस्टर उत्साहत
भवानीनगर – लेक ही दोन्ही घरची लक्ष्मी असते. मला खंत आहे की मला मुलगी नसल्याची. खरा वंशाचा दिवा ही आपली मुलगीच असते. मला अभिमान आहे मी स्त्री असल्याचा असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी व्यक्त केले.
अशोकनगर (भवानीनगर, ता. इंदापूर ) येथील यशवंत(भाऊ) पाटील मित्र परिवार सार्वजनिक गणेशोत्सव 2024 या गणेशोत्सवाच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी सारिका भरणे आल्या होत्या यावेळी सारिका भरणे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. गेले अनेक वर्षे या ठिकाणी हे गणेश मंडळ मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करत असून या मंडळाचे अध्यक्ष मुस्लीम समाजाचे आरिफ तांबोळी हे असले तरी सर्व धर्म समभाव या संस्कृती तिला साजेल
असेच या मंडळामध्ये कोणत्याही जातीपातीचा विचार केला जात नसून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. खर्या अर्थाने सामाजिक काम करणारे व गोरगरिबांच्या कायम पाठीमागे उभे राहणारे यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहमध्ये हा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.
गणेश उत्सवात वेगवेगळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होतात. महा मिनिस्टर होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. यामध्ये एलईडी टीव्ही, फ्रिज, बक्षीस, रेंजर सायकल, अशी प्रथम, द्वित्तीय, तृतीय, चतुर्थ अशी विविध आकर्षक बक्षिसे देत कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सारिका भरणे यांनी सर्व महिलांमध्ये सामील होऊन स्वतः देखील या महिलांना मार्गदर्शन करून दोन तास या महिलांबरोबर मोठ्या आनंदामध्ये व उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडेपर्यंत त्यांनी आपली उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी सारिका भरणे यांचे आभार मानले.





