पुणे जिल्हा : शिक्रापुरात चालत्या कारने घेतला पेट
Updated On:

शिक्रापूर – येथे पुणे-नगर महामार्गावर पाबळ चौक येथे चालत्या कारने पेट घेतल्याने खळबळ उडाली. पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला असून कोणतीही हानी झाली नाही; मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रवासी वाहतूक करणारी स्विफ्ट कार (एमएच 14 जीयू 2517) ही घेऊन सचिन गुल्लाने हा आलेला असताना पाबळ चौक येथे कारच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
अचानक कारला आग लागल्याने खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मिलिंद देवरे, शंकर साळुंखे, विकास पाटील, अमोल दांडगे, ज्ञानदेव गोरे, अंतेश्वर यादव, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीवर नियंत्रण आणत नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.





