पुणे जिल्हा : भरधाव टेम्पोने अल्पवयीन मुलाला चिरडले ; संतप्त जमावाने पेटवला टेम्पो
Updated On:

निरा- मोरगाव रस्त्यावरील घटना
डोर्लेवाडी : निरा-मोरगाव रस्त्यावर जगतापवस्ती येथे निरा डाव्या कालव्याच्या वळणावर आयशर टेम्पोने एका १६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडलीय यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.. मुलाच्या मृत्यू नंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला.
या अपघातात नीरा येथील पोकळे वस्तीत राहणारा १६ वर्षीय इजाज खुर्शीद सय्यद याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने आयशर टेम्पो पेटवून दिलाय त्यामुळे काही काळासाठी या भागातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव शांत केला तर नीरा येथील ज्युबिलंट अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी आग विजवलीय.. या आयशर टेम्पोचा ड्रायव्हर फरारी झाला असून त्याचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत..





