Pune District : जाधववाडीतील आढाळगे कुटुंबास मदतीचा हात

सासवड : दिवे गावाजवळील जाधववाडी (ता. पुरंदर) येथील कुमार सर्जेराव आढाळगे यांच्या घरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे वस्तू जळून नुकसान झाले होते. ही बातमी समजताच स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जगताप यांनी संसार उपयोगी वस्तू देऊन आढाळगे परिवाराला मदतीचा हात दिला.
यावेळी त्यांच्या समवेत स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुर शिवरकर, माधव शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव, राजू आढाळगे, श्रीकांत जाधवराव, भगवान आढाळगे, सोमनाथ आढाळगे उपस्थित होते.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाबाराजे जाधवराव, दिवे गावचे सरपंच योगेश टिळेकर, उपसरपंच सुमन टिळेकर, माजी उपसरपंच भारती आढाळगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव, गजानन आढाळगे या जाधववाडीकर ग्रामस्थांनी जळालेल्या घराला भेट देवून आढाळगे परिवाराला वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.





