पुणे जिल्हा : शिरूरमध्ये ८४ लाखांचा ऑनलाइन गंडा

पोलिसांत गुन्हा दाखल : नोकदरदार फसला
शिरूर – शिरूर शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट ॲड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रॉन्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील, असे सांगून तब्बल एकूण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे.
प्रकाश विनायक धामणकर (वय 43, रा. बागवान नगर, शिरूर, मूळ रा. चिंचाळा, जि चंद्रपूर) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याने वेगवेगळी कारणे देऊन वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेण्यात आले आहे. आयडीबीआय बँकेवरून आय या बँक ॲपमध्ये २० लाख AMAN KUMAR या आयडीवर ट्रॉन्सफर केले. त्यानंतर फायनल स्टेप ऑफ व्हिरेफिकेशन या नावने MANPURIA AGRO P या आयडीवर ११ लाख ७० हजार ट्रॉन्सफर केले.
मला सांगितले, डीसीपी साहेब यांनी सांगितले आहे की, म्युचल व शेअर्समध्ये पैसे असल्याने तुमचे व्हिरीफिकेशन पूर्ण होत नाही. त्यांनतर त्यांना म्युचल फंड व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकण्यास सांगितले. म्युच्युअल फंडमधील पैसे काढले. शेअर्स मार्केटचे शेअर्स विकून ३९ लाख ८४ हजार इतके आयसीआयसीआय बँकेत घेतले. त्यानंतर अपेक्षा हॉस्पिटल या आयडीवर २० लाख रुपये, तसेच LLTAJ Rali या आयडीवर ६ लाख ८४ हजार, तसेच MAHENDRA BISHNO या अंकाउंटवर १० लाख रुपये, DHIRENDRA/YESB0000263 या आयडीवर ३ लाख ट्रॉन्सफर करून घेतले. त्यांनतर त्यांनी सांगितले की, तुमचे आज शेवटचे व्हेरीफिकेशन आहे.
पर्सनल लोन काढावे लागेल, असे सांगितले. तुम्ही पर्सनल लोनकरीता ॲप्लीकेशन करा, असे सांगितल्याने ऑनलाइन. नंतर पर्सनल लोन आयसीआय बँकेने लोन १२ लाख मंजूर केले. PANGYA digit या आयडीवर ११ लाख ८० हजार ट्रॉन्सफर करुन घेतले. pandya digit या आयडीवर १ लाख रुपये असे वेगवेगळ्या अकाउंटवरुन तब्बल 84 लाख 34 हजार रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक केली, अशी फिर्याद प्रकाश विनायक धामणकर यांनी दिली. त्यानुसार शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. शिरुर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





