पुणे जिल्हा : शिरूरमध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केस दाखल

शिरूर : शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने ही २० वर्षीय मुलगी २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत २० जुलैला बागवान नगर येथील अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीबरोबर चॅटींग करत असल्याने आई रागावल्याने ती घर सोडून निघून गेली आहे.
तिसऱ्या घटनेत रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले आहे.
आता मनिषा राजेंद्र शुक्ला ( वय. ३५ वर्षे ) रा. शिक्रापुर ही महीला शिरूर येथील भाजी मार्केट येथुन कोणास काही एक न सांगता निघुन गेली आहे .ती अद्याप पर्यंत घरी आले नाही. खबर देणार यांनी तिचा शिरूर परीसर व नातेवाईक यांचेकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही.
मिसींग व्यक्तीचे नाव व वर्णन
नावः मनिषा राजेंद्र शुक्ला (वय. ३५ वर्षे ) रा. शिक्रापुर ता. शिरूर जि. पुणे, रंग काळे सावळे, चेहरा उभट, केस काळे लांबसडक, उंची ५ फुट, अंगात लाल रंगाच पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, कानामध्ये सोन्याची रिंग, गळ्यात सोन्याचे मंगळसुत्र, पायामध्ये पैजन व जोडवे, कपाळावरती लाल रंगाची टिकली एकुणच शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महीलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.





