Pune District : जुन्नर तालुक्यात 4316 घरकुलांना मंजुरी

लेण्याद्री : अनेक वर्षांपासून आपल्या पक्क्या घराचे स्वप्न पाहणार्या 4316 ग्रामस्थांमध्ये यंदा आनंदाचे वातावरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्याला दिलेल्या 4486 घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी 4316 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कनिष्ठ सहाय्यक दारासिंग सिंगल यांनी दिली.
मंजूर झालेल्या लाभार्थ्यांपैकी जागा असलेल्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान वितरण सुरू झाले आहे. तर इतर 170 घरकुले मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांनी आधार कार्ड केवायसी किंवा इतर त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन विस्तार अधिकारी वृषाली साबळे यांनी केले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याला दुसर्या टप्प्यात यावर्षी 38 हजार 827 घरकुले बांधण्याची उद्दिष्ट शासनाने दिले होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 32118 घरकुलांना मंजुरी दिली आहे. यात 2024-25 अंतर्गत जुन्नर तालुक्यातील 4486 घरकुलांचा समावेश आहे.





