पुणे जिल्हा : भागडी येथे शर्यतीत ४२५ बैलगाडे धावले

-हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
मंचर – आदर्श गाव भागडी (ता. आंबेगाव) येथील ६७ व्या हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस झालेल्या बैलगाडा शर्यतीत ४२५ बैलगाडे धावले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या बैलगाडा शर्यतीत धावलेले बैलगाडे पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक फळी फोड मच्छिंद्र नामदेव हाडवळे (पहिला दिवस), दौलत शंकर भोर व अनिल लक्ष्मण थोरात (दुसरा दिवस) दुसरा क्रमांक, फळी फोड ज्ञानेश्वर लक्ष्मण पोंदे (पहिला दिवस) गोट्याभाऊ गुंजाळ (दुसरा दिवस) तृतीय क्रमांक फळी फोड धनु सुधाकर हिंगे (पहिला दिवस) नवनाथ दशरथ सरोदे, (दुसरा दिवस) फायनल रामदास लक्ष्मण बांगर, पहिला क्रमांक विठ्ठल नाथा गाडेकर, दुसरा क्रमांक महादू विठोबा सैद, तिसरा क्रमांक घाटाचा राजा सोपान सुंदरराव खांडगे व अंकुश बनकर जुगलबंदी (पहिला दिवस) वैभव नामदेव उंडे, संदीप भाऊ ऊंडे, निलेश देवराम उंडे ,सागर मोरे, शिवांश गुंजाळ.
दुसरा दिवस घाटाचे उद्घाटन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार व कचर पानमंद यांच्या हस्ते संपन्न झाले. बैलगाडे शर्यत यशस्वी होण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक पोपट थिटे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सैद, महेश थिटे, प्रशांत बराटे, धोंडिराम आगळे, विश्वनाथ उंडे, संदीप उंडे, अनिल उंडे, विलास नाथा उंडे, नामदेव नाथा उंडे, पोपट दत्तू उंडे, पोपट गवारी, सखाराम आगळे, किसन दत्तू उंडे,
बाळासाहेब उंडे,रमेश आगळे, रवींद्र आगळे, माजी सरपंच वैभव उंडे, मोतीराम उंडे,बबनराव सैद,ललित थिटे, रोहन आगळे, अजित ससाणे, नवनाथ बारेकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत गवारी, उपाध्यक्ष मच्छिंद्र सैद यांनी परिश्रम घेतले. भागडेश्वर तरुण मंडळ, पुणे- मुंबईकर, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सिनेसृष्टी चित्रपट निर्माते निनाद वैद्य व निहाल सुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निलेश थोरात यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले.
……….





