पुणे जिल्हा : शिक्षकांसाठी थ्री डी प्रिंटिंग टेकनॉलॉजीचे धडे

कासारी येथे प्रशिक्षणात दहा शाळेतील शिक्षक सहभागी
शिक्रापूर – कासारी (ता. शिरूर) येथील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात शिरुर तालुक्यातील शिक्षकांसाठी थ्री डी प्रिंटिंग टेकनॉलॉजीचे प्रशिक्षण देण्यात आले. शिरुर तालुक्यातील दहा शाळेतील शिक्षकांनी यावेळी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्याना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार असल्याने तंत्रज्ञानच्या मदतीने मुलांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याचे कुतूहल तयार होईल, असा अभिप्राय अनेक शिक्षकांनी दिला.
शिरुर तालुक्यातील विविध शाळांमध्ये लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि थ्री एम इंडिया यांच्या नियोजनातून शिरूर तालुक्यातील सहा शाळांमध्ये स्टीम वंडर ट्रिंकलिंग लॅब हा उपक्रम सुरु असून यामधून मुलांना इनोवेशन आणि टेकनॉलॉजी याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय कासारी,
संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, कै. रामराव गेणुजी पलांडे आश्रम शाळा मुखई, विद्या विकास मंदिर करंदी, सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालय केंदूर, घनोबा विद्यालय धानोरे, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी, महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे, भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा, गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे आदी शाळांमधील वीस शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत थ्री डी टेक्नॉलॉजी आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये टेक्नॉलॉजी समावेश यावर भर देण्यात आला.
सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांनी थ्री डी प्रिंटरचा वापर करून काही थ्री डी मॉडेल बनवले. लर्निंग लिंक्स फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमने हे प्रशिक्षण दिले. यावेळी लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे सहाय्यक व्यवस्थापिका किरण मिसाळ, आशिष बालपांडे, महेंद्र सूर्यवंशी, सतीश काटकर, सुहास बिडगर, विक्रांत बुटले, अमीर शेख, दिनेश मार्कंडे, महेश कारखेले उपस्थित होते. लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक शांताराम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अशोक सरोदे यांनी स्वागत केले. आशिष बालपांडे यांनी आभार मानले.





