पुणे जिल्हा : हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीत 365 बैलगाडे धावले

घोडेगावात दत्तजयंतीनिमित्त यात्रा-उत्सव
घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सद्गुरू सेवा मंडळ दत्तजयंतीनिमित्त आयोजित हिंदकेसरी बैलगाडा स्पर्धा दोन दिवस पार पडल्या. स्पर्धेचे हे 45 वे वर्ष होते. या स्पर्धेत 365 स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कैलास काळे यांनी दिली.
या स्पर्धेत आप्पा शेठ साकोरे, बबनशेठ रामशेठ शेलार व ज्ञानेश्वर चव्हाण यांनी घाटाचा राजा व यात्रेतील आकर्षक बारी सागर गायकवाड यांनी बहुमान पटकाविला. प्रथम क्रमाकांत 101 बैलगाडे आले. फळीफोडचा बहुमान जितेंद्र मालुंजे आणि अक्षय मुळूक यांनी पटकावला. द्वितीय क्रमांकात 104 बैलगाडे आले.
फळीफोडचा बहुमान शाम खंडू गव्हाणे व बबन तोत्रे यांनी पटकावला. तृतीय क्रमांकात 63 बैलगाडे आले. फळीफोडचा बहुमान सुदाम यशवंत पारधी व अक्षय रवींद्र ढोले यांनी पटकावला. चतुर्थ क्रमाकांत 24 गाडे आले. फळीफोडचा बहुमान युवराज शिंदे व राजेंद्र नवले यांनी पटकवला.
यात्रेस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांनी भेट दिली. यात्रा यशस्वी होण्यासाठी विनोद कासार, सत्यवान घोडेकर, खंडू शेटे, हरिश्चंद्र घोडेकर, संदीप काळे, सुनील इंदोरे, गणेश घोडेकर,
गणेश झोडगे, ज्ञानेश्वर काळे, सुभाष मावळे, शिवाजी घोडेकर, विनायक भागवत, पिंटू शेटे, राजेंद्र शेटे, गोविंद काळे, अभिजित काळे, स्वप्नील घोडेकर यांनी परिश्रम घेतले. बैलगाड्याचे सेकंद मोजण्याचे काम प्रा. राजेंद्र पानसरे व युवराज काळे यांनी व निशाणाचे काम नवनाथ काळे यांनी पाहिले.यात्रेचे समालोचन साहेबराव आढळराव, माऊली पिंगळे, बाळासाहेब टेमगिरे, लक्ष्मण बांगर यांनी केले.





