Pune District : सासवड, जेजुरी, नीरेत 353 जणांचे रक्तदान

जवळार्जुन : पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित सासवड, जेजुरी, नीरा येथे माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसाचे निमित्त आयोजित शिबिरात 353 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक धैर्यशील शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक रक्तदात्यांचा आयोजकांमार्फत प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. कैलास सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला शिबिराच्या यशस्वीतेसाठी अक्षय ब्लड सेंटर हडपसर तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जेजुरी शहराध्यक्ष नितीन नाझीरकर, तालुकाध्यक्ष सुकुमार नाझीरकर, शरद कापरे, विक्रम खामकर, गणेश कामथे, ओंकार कदम, अशोक शिर्के, शरद बालगुडे, विलास बलकवडे, ऋषिकेश रणनवरे, पंकज गाढवे, संतोष कुदळे, राहुल महानवर, प्रवीण हरपळे, सुमित पवार, मोहन चौधरी त्याबरोबर जेजुरी पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय जेजुरी, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी आणि जेजुरीकर ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.





