Pune District : श्री ज्ञानेश्वरमधील 2152 विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लसीकरण
Updated On:

आळंदी : खेड तालुक्यातील आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मेंदूज्वर लसीकरण मोहीम महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये बालवाडी ते नववीच्या 2152 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली
आळंदी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. ऋषिकेश फुंदे, अनिल गुंजाळ, बसवंत बहिरगोंडे, देवशाला चाटे, पल्लवी साठे, पुष्पा अंभुरे या सर्व डॉक्टर आणि नर्सच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले.
मंगळवार (दि. 18) ते शुक्रवार (दि. 21) या कालावधीत चाललेल्या या संपूर्ण मोहिमेचे नियोजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, अनिता पडळकर राजश्री भुजबळ, पूजा चौधरी यांनी केले.





