Pune District : इंदापूर तीनच किलोमीटर असताना दाखवले 16 किलोमीटर

इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा इंदापूर तालुक्यातून जात आहे. वडापुरी गावाहून इंदापूरकडे विठ्ठलवाडीनजीक इंदापूर शहराचे अंतर तब्बल तीन ते चारच किलोमीटर फक्त आहे; मात्र दिशादर्शक फलकावर सोळा किलोमीटर अंतरलिहिल्याने प्रवाशांना इंदापूर कुठे गेले, हे कळतच नाही. खरे तर हे सोळा किलो मिटर अंतर कशासाठी दाखवले, याचा शोध नागरिक घेत आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, अकलूजकडून इंदापूरकडे येणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अनेक ठिकाणी नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातच चुकीचा आशय लिहून, अंतर लिहून, प्रवाशांची मोठी फसगत होत आहे. या बोर्डमुळे नवीन प्रवासी मात्र ज्यांचे इंदापूरला काम आहे ते इंदापूर बायपास वरून पुढे जात आहेत. त्यामुळे चुकीच्या बोर्डचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग करण्यामागे शासनाचा उदात्त हेतू आहे. धार्मिक हेतू आहे, असे असतानाही, केवळ अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे, असे प्रकार घडत आहेत. वरिष्ठ पातळीवरून या पालखी मार्गाकडे लक्ष देऊन प्रवासी वर्गाला तसेच भक्तगणांना, सोयस्कर पालखी मार्ग निर्माण करून द्यावा. अशी मागणी होत आहे.
तो बोर्ड बदला
इंदापूर शहराचे अंतर चुकीचे दाखवल्यामुळे प्रवासी फसत आहेत त्यामुळे लावलेला तो बोर्ड तात्काळ बदला. अशी मागणी प्रवासी करीत आहेत.





