Pune District : सभासदांना 14 टक्के लाभांश वाटप

श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेची सभा खेळीमेळीत
भवानीनगर – श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेने सभासदांना 14 टक्के लाभांश दिल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.
पतसंस्थेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व विषयावर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करून खेळी मेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब देवकाते हे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष दीपक निंबाळकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी शिंदे,
संचालक रमेश मचाले, बाळासाहेब गोवेकर, विजय यादव, युवराज साळुंखे, हनुमंत धापटे, भालेराव झारगड, राहुल साबळे, दीपक भोसले, सुनील सर्जे, पुष्पा रायते, संगीता काटे, दीपक गायकवाड, अभिजीत सावंत, व्यवस्थापक नंदकुमार निंबाळकर, सचिव शिवाजी तांबे, सह सचिव दादासाहेब साळुंखे व सर्व सभासद उपस्थित होते.
अध्यक्ष दादासाहेब देवकाते म्हणाले की, पतसंस्था आज सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरी करीत आहे. या पतसंस्थेची वैयक्तिक कर्ज मर्यादा 50 लाख रुपये तर तातडी कर्ज एक लाख रुपयापर्यंत मर्यादा आहे. त्याचबरोबर कायम ठेवीच्या 90 टक्के कर्ज सभासदांना ही संस्था देत आहे. या संस्थेकडे एकूण मुदत ठेव 9 कोटी 93 लाखापेक्षा अधिक असून कायम ठेऊ 95 लाखापेक्षा अधिक आहे.
त्याचबरोबर पतसंस्थेचा कारभार देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून अतिशय चांगल्या पद्धतीने पतसंस्थेचा कारभार सुरू असल्याने सर्व सभासदांना योग्य पद्धतीने न्याय देण्याची भूमिका घेतली जात आहे, त्यामुळे येथून पुढील काळात देखील पतसंस्था सभासदांच्या हिताचा विचार करून पतसंस्थेचे माध्यमातून पतसंस्थेचे नाव लौकिक वाढवणार आहे व सर्व सभासदांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम नक्कीच इथून पुढील काळात देखील ही पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ मिळून करत राहतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभासद संख्या : 184
भाग भांडवल 3 कोटी 66 लाख 98 हजार 850 रुपये
मुदत ठेव : 9 कोटी 93 लाख 96 हजार 131 रुपये
कर्ज व्यवहार : 16 कोटी 70 लाख 98 हजार 989 रुपये
ऑडिट वर्ग : सतत अ





