पुणे जिल्हा : १३८ चेक बाउंस प्रकरणात वसुली

सासवडमध्ये मोबाइल व्हॅन लोक अदालत
सासवड – न्याय आपल्या दारी या संकल्पनेनुसार मोबाईल व्हॅनमध्ये प्रकरणांचा निपटरा करण्यात आला. यावेळी दिवाणी व फौजदारी अशी एकूण सहा प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. १४४७२ रुपयांची बँकाची १३८ चेक बाउंस प्रकरणात वसुली झाली. प्रमुख पॅनल जज म्हणून ए. के. पटणी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी काम पाहिले.
पुरंदर तालुका विधी सेवा प्राधिकरण, सासवड व सासवड बार असोसिएशन यांचे संयुक्त विदयमाने महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांचे निर्देशाप्रमाणे मोबाईल व्हॅन लोकअदालतचे आयोजन प्रमुख न्यायाधीश ताहेर बिलाल, न्यायाधीश एस. के. देशमुख, एम. एस. भरड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मोबाइल व्हॅन लोकअदालतचे उदघाटन ए. के. पटणी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा प्रमुख न्यायाधीश, मोबाइल व्हॅन लोकअदातीचे उद्घाटन करण्यात आले. ॲड. तेजस खाडे व ॲड. सागर सांवत यांनी पॅनल मेंबर म्हणून काम पाहिले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड . बाबासाहेब पिलाणे, अँड अक्षय नाझीरकर, अँड शुभम राउत, अँड राहुल कोलते सासवड न्यायालयातील सहअधीक्षक महेश जोशी, परशुराम देशमुख. महेश बारट्टके उपस्थित होते. अँड . प्रसाद किकले यांनी प्रास्ताविक केले. अँड. गणेश उरणे यांनी सूत्रसंचालन केले.





