पुणे जिल्हा : कडूसच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १३तालुक्यांचा सहभाग

कडूस – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा अधिकारी कार्यालय पुणे, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना खेड, तालुका खेड अधिकारी कार्यालय व रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील कडूस येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध तीन वयोगटातील १३ तालुक्यातील एकूण ७८ संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धा उद्घाटनप्रसंगी क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते,सरपंच शहा नवाज तुरुक, उपसरपंच रंजना पांनमंद, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, कडूस शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक गारगोटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शं.ढमाले, आबा उद्योग समूहाचे उद्योजक अभिजित शेंडे, बाळासाहेब धायबर,संचालक प्रकाश कालेकर, संजय जाधव, माऊली धायबर, ग्रामपंचायत सदस्य हेमलता खळदकर, गणेश मंडलिक, बारकू गायकवाड,
पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव रामदास रेटवडे, अजित शेख, भैरवनाथ पाणी वाटप संस्था अध्यक्ष दिलीप ढमाले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चांगदेव ढमाले, बाळासाहेब बोंबले, उद्योजक निलेश जेधे, राजकुमार राऊत, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पोटे, खेड क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष नितीन वरकड, जालिंदर आवारी तसेच बारामती, मुळशी, जुन्नर, शिरूर, पुरंदर, इंदापूर,मावळ या तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते.
सचिन घाडगे, संभाजी काळे, प्रकाश गाडे, सुधा खोले, राजू शिंदे, उमेश गाडगे, शंकर करमारे, शुभम कानस्कर, बंटी यांनी पंच म्हणून काम केले. प्रवीण काळे, दत्तात्रय येवले, तानाजी कोळेकर, आजिनाथ केदार, बबन डांगले, जालिंदर पवळे, संतोष काळे, लतीफ शेख, कुंडलीक गारगोटे, शंकर जाचक, शंकर शिंदे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
वयोगट निहाय अंतिम निकाल : १४वर्षे वयोगट (मुली) प्रथम खेड, द्वितीय: बारामती, तृतीय: शिरूर
१४वर्षे वयोगट (मुली) प्रथम:बारामती,द्वितीय: मावळ तृतीय: जुन्नर, १७ वर्षे वयोगट( मुली) प्रथम:इंदापूर ,द्वितीय: हवेली तृतीय: बारामती १७वर्ष वयोगट (मुले) प्रथम : इंदापूर, द्वितीय: बारामती ,तृतीय. खेड : १९ वर्षे वयोगट (मुली) प्रथम :आंबेगाव, द्वितीय :बारामती, तृतीय क्रमांक : इंदापूर. १९वर्षे वयोगट (मुले) प्रथम : इंदापूर,द्वितीय: पुरंदर आणि तृतीय : आंबेगाव.





