Pune District : दौंड खूनप्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप

बारामती : दौंड येथे पती-पत्नी गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाताना पतीचा खून केल्याप्रकरणी बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, तसेच इतर विविध कलमांखाली सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालय स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक निकाल आहे.
शिक्षा सुनावलेल्यामध्ये ४ सख्खे भाऊ, ३ महिलांचा समावेश आहे.
ही घटना (दि.३) मे २०१८ रोजी दौंड येथे घडली होती. फिर्यादी मीना नरवाल व त्यांचे पती विनोद नरवाल हे चतुर्थी असल्याने रात्री १० वाजता त्यांच्या दुचाकीवरून गणपतीचे दर्शन घेऊन येताना सर्व आरोपींनी त्यांना दौड कोर्टाजवळ पासलकर वस्ती येथे अडवले.
त्यावेळी त्यांच्यावर सर्व आरोपींनी तलवार, कोयता, लोखंडी पाइपने जोरदार हल्ला केला. यात गंभीर जखमी विनोद नरवाल यांना उपचारासाठी पुणे येथे नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले.





