पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी अभाविपची निदर्शने
Updated On:

पुणे – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता ११वी च्या सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे थांबल्या आहेत. ही प्रक्रिया थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ११वी च्या प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी यासाठी अखिल भारतीय विदयार्थी परिषदतर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग संचालनालय येथे निदर्शने करण्यात आली.




