Pune: अकरावीच्या प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुणे – राज्यात काही जिल्ह्यांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली असून सर्वांसाठी खुला फेरीतून विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल.
राज्यातील ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालयातील २१ लाख ५० हजार १३० जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत १२ लाख ३ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी खुला या फेरीअंतर्गत विशेष फेरी राबवण्यात येत आहे. त्यासाठी १७ ऑगस्ट मुदत होती.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.





