Pune Cyber Crime : टेलीग्रामवरचा टास्क पडला महागात! तरुणाची २९ लाखांची सायबर फसवणूक
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – टेलीग्राम अॅपवरील टास्क पुर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २९ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.तक्रारदार तरूण येरवड्यात राहायला असून, १८ ऑगस्टला चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क केला. अॅपवर दिलेला टास्क पुर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर किरकोळ स्वरूपात नफा देत विश्वास संपादित केला. त्यानंतर एक महिन्यातचोरट्यांनी तरूणाकडून तब्बल २९ लाख रूपये ऑनलाईन मार्गाने घेतले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.




