Pune Crime : वारजेत दुचाकीस्वार चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले
Updated On:

पुणे – किराणा दुकानामध्ये साहित्य आणण्यासाठी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास वारजेतील आनंद कॉलनीत घडली. याप्रकरणी महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला काल सकाळी सातच्या सुमारास किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. महिलेने आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही पुâटेजनुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पारवे तपास करीत आहेत.





