Pune Crime : एकाच दिवशी शहरातील तीन अट्टल गुन्हेगार एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द

पुणे – पुणे पोलिसांनी एकाच दिवशी तीन अट्टल गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्यानूसार स्थानबध्द केले आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवस गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये मोक्का, तडीपारी आणी स्थानबध्दतेसारखी कारवाई करण्यात येत आहे.
राकेश प्रकाश साळवे, (23 रा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलनी मंगळवार पेठ ), साईराज राणाप्रताप लोणकर (21. रा.पांडुरंग आळी कोंढवा खुर्द पुणे ), अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (27, काकडे वस्ती कोंढवा बुा ) हे अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहेत.
त्यांनी त्याचे साथीदारांसह फरासखाना व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, चॉपर, पालघन, लाकडी बांबु, या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा,अपहरण, जबरी चोरी, गंभिर दुखापत, दुखापत बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील सहा वर्षामध्ये. त्याचेविरूध्द एकुण 19 गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (फरासखाना पोलीस स्टेशन) व सरदार पाटील ( कोंढवा पोलीस स्टेशन) यांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता गुन्हेगारांना स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहेत. अशाप्रकारे एकाच वेळी तिन गुन्हेगारांना स्थानबध्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.





