Pune Crime : ‘वर्क फ्रॉम होम’चं आमिष…आणि ९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – वर्क फ्रॉम होम देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने एका नागरिकाची तब्बल ९ लाख ६ हजार २४१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३ मे २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली.याप्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. २७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्राम आयडी धारकाने फिर्यादींना ग्रुपमध्ये ॲड केले.
त्यानंतर त्यांचे अकाऊंट तयार करून रेटिंगच्या ॲडचे टास्क करायला लावले. या कामावर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ९ लाख ६ हजार २४१ रुपये भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





