pune crime : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची होणार चौकशी; पोलीस आयुक्तांचे आदेश

pune crime – आरोपींना जेलमध्ये ने आण करण्यासाठी असलेली गाडी एका निर्जनस्थळी थांबवून त्यातील कैद्यांना कोणती तरी पाकिटे दिली जात असल्याचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्टीट केला. याची दखल घेत आता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी वैâद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत, अशा आशयाचे व्टीट अंधारे यांनी केले.
त्यानंतर गुरुवारी दिवसभर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत व्हिडिओत पोलिस व्हॅनचा नंबर दिसतो असून ही व्हॅन पिंपरी-चिंचवड पासिंगची आहे. साधारणतः आरोपी जेलमध्ये ने आण करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओप्रकरणी आता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार अर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे याप्रकरणाची चौकशी करणार आहेत. व्हायरल व्हिडीओ २६ जुलै रोजीचा असून चौकशीनंतर दोषी आढळणार्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे





