Pune Crime : स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना
Updated On:

पुणे :- स्वारगेट परिसरात गणेश कला क्रीडा मंच जवळील डायमंड हॉटेल समोरील रस्त्यावर बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे.
रिक्षातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तीने दुचाकी वरील एका इसमावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना सदर जागी दोन पुंगळ्या मिळून आलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर रक्त सांडल्याच्या खुना दिसून आले आहेत. मात्र, रिक्षातून नेमका कोणी आणि कोणावर गोळीबार केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
या घटनेत नेमकी कोणाला गोळी लागली आहे व कोण जखमी झाली आहे हे अद्याप पोलिसांना कळू शकलेले नाही.





