Pune Crime: महर्षीनगरमध्ये तरुणावर हल्ल्याचा थरार; पिस्तूल लॉक झाल्याने वाचला जीव
Updated On:

पुणे – महर्षीनगर परिसरातील आगाशे शाळेसमोर शुक्रवारी रात्री एका तरुणावर धारदार हत्यारांनी ५ ते ७ वार करून खुनाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. बाळा उर्फ राहुल ढोले असे जखमी तरुणाचे नाव असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळी झाडण्याचाही प्रयत्न केला, पण पिस्तूल लॉक झाल्याने गोळीबार टळला. घटनेनंतर नागरिकांनी एकत्र येऊन बाळा याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोर कोण याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस आरोपींच्या मागावर आहेत.





