Pune News : 23 वर्षांपूर्वीच्या खुनाचा घेतला सूड; शिंदेवाडीतील हत्याकांड उघड, चार आरोपी जेरबंद
Pune News : भोर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खुनाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Pune News : भोर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खुनाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तब्बल 23 वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा सूड उगवण्यासाठी ही हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. (Pune News)
11 जुलै रोजी रात्री शिंदेवाडी हद्दीतील जुन्या कात्रज बोगद्याजवळील हॉटेल आमराई परिसरात संजय बाबुराव कडू देशमुख (वय 40, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हा) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. (Pune News)
या प्रकरणी गौरव चंद्रकांत झेंडे यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune News)
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी या दोघांना 14 जुलै रोजी ताब्यात घेतले. (Pune News)
चौकशीत त्यांनी मिझान गॅसउद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की, आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा 2003 मध्ये मृत संजय कडू देशमुख यांनी खून केला होता. त्याचाच सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आली. (Pune News)
दरम्यान, चौथा आरोपी संदीप कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमासह अन्य कलमांनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. (Pune News)
Pune crime : बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी पसार
Crime News: पिंपळे जगतापमध्ये युवकाचा खून; फरार आरोपींना अटक





