पुणे – दरोडा टाकण्याच्या तयारीत अटक करण्यात आलेल्या टोळीकडून शहरातील विविध गुन्ह्यातील तब्बल 180 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अरुण शिवाजी गायकवाड (30 ), मोहन गणेश जाधव (30 ) शिवराज अर्जुन वाडेकर (22 ) शितल श्रीनिवास वाडेकर (29 ) भिमबाई रमेश बजंत्री (45 सर्व रा. मुंढवा) प्रशांत मिठु थोरबोले (22 रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवार पेठेतील एका मंदीराजवळ टोळके दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची पोलीस अमंलदार अनिकेत बाबर यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून महिलेसह सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रिक्षा, कोयता, चॉपर, मिरची पुड, सेल्फ डिफेन्स पेपर स्प्रे दोन कटर असे दरोड्याचे साहित्य जप्त केले. चौकशीत आरोपींनी पीएमपीएल बसमध्ये प्रवास करुन नागरिकांच्या खिशातील रक्कम आणि महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. सराईत शितल वाडेकर विरुध्द चोरीचे 11 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, विजयसिंग वसावे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मिना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली. पीएमपीएलमध्ये अशी करीत होते चोरी सराईत टोळके पीएमपीएल बसमधून प्रवास करीत महिलांसह जेष्ठांना लक्ष्य करीत होते. प्रवाशाभोवती गर्दी करून दागदागिने, खिशातील रक्कम, महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून टोळके पसार होत होते. पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांच्या खबऱ्यांमुळे सराईत टोळीचा पर्दापाश करण्यात आला.