Pune Crime : विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार ; पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी अजिक्य रायसिंग जाधव (वय ३२, रा. पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, उपनिरीक्षक जाधव आणि पीडित तरुणीची २०२३ मध्ये समाज माध्यमात ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंंबंध निर्माण झाले. जाधवने तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. विवाहाबाबत तरुणीने विचारणा केल्यावर त्याने शिवीगाळ करुन मारहाण केली, तसेच धमकीही दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.





