Pune Crime: अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह ५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे – कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर कोंढवा पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाकीर रमेश बागवे ( वय ३६, रा. लोहियानगर, भवानी पेठ), हरून नबी शेख ( वय २५ ), बिक्रम साधन शेख ( वय २५), अमानत अन्वर मंडल ( वय २२) आणि अमानत अन्वर ( वय २४, सर्व रा. मालुंचाईस्ट्री थना शांतीपुर जि. नोदीया प. बंगाल ) यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाकुजन्य उत्पादने अधिनियम २०१८ चे कमल ४(अ) २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकीर बागवे हे हॉटेलचे चालक असून अन्य चौघे तेथील कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून २३,५०० रुपये किमतीचे तंबाखूजन्य हुक्काचे प्लेव्हर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे व पोलिस अंमलदार हे कोंढवा भागात पेट्रोलिंग करत असतांना एनआयबीएम रस्त्याच्या परिसरात आलेल्या द व्हिलेज या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री या हॉटेलवर छपा टाकून ही कारवाई





