Pune Crime: स्कॉर्पिओच्या नंबरचा गैरवापर; निलेश घायवळ विरोधात गुन्हा

पुणे – वाहनांच्या नंबर प्लेटचे बनावटीकरण करून पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्याच प्रकार कोथरुड परिसरात उघडकीस आला आहे. सागर भाऊसाहेब बंडगर (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या मालकीच्या स्कॉर्पिओ (MH12XW8055) गाडीचा नंबर कुख्यात गुंड निलेश घायवळने एका ॲक्सेस स्कुटरला लावला होता. या स्कुटरचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळला पासपोर्ट दिला कोणी? पोलीस उपायुक्तांनी स्पष्टचं सांगितलं
पोलिसांनी सांगितले की, निलेश घायवळची चारचाकी आणि दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या सुझुकी ॲक्सेस स्कुटरवर स्कॉर्पिओचा नंबर (MH12XW8055) लावण्यात आला होता.
Pune Crime : मोक्कावाला गुंड थेट लंडनला! नीलेश घायवळने पोलिसांना दिला चकवा ; लूक आऊट नोटीस जारी
ही स्कुटर काळ्या रंगाची असून तिचा मूळ नंबर MH12XW9055 असा आहे. तपासात समोर आले की ही ॲक्सेस स्कुटर निलेश घायवळ (रा. कोथरुड, पुणे) याच्या नावावर नोंदणीकृत आहे. परंतु त्याने स्कॉर्पिओचा नंबर वापरून शासनाची तसेच स्कॉर्पिओ मालकाची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.





