Pune Crime: मद्यप्राशन केलेल्या एका माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर (वाहक) चाकूने हल्ला केला. हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय.38,रा. मुळशी, मुळ. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री आठ वाजताच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे. Pune Crime पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव या पीएमपीएमएलमध्ये वाहक म्हणून नोकरीस आहेत. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्या वाहक म्हणून मनपा ते एसआरए विमाननगर या बसमध्ये कर्तव्यावर होत्या. जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला. त्याने जुना बाजार ते येरवडा असे तिकीट काढले. Pune Crime हेही वाचा – Pune: खानवडी शाळा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे निलंबित काही वेळाने तो प्रवाशी बसमधील इतर प्रवाशांना शिवीगाळ करून लागला. त्याने मद्यप्राशन केले असल्यामुळे प्रवाशांनी त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. तरी तो शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादींना इतर प्रवाशांची तिकेटे काढत असताना अडथळा निर्माण केला. अलंकार चौकात बस आल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादींनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तो फिर्यादींच्या अंगावर धाऊन गेला. तसेच मोठ्याने शिवीगाळ करून त्यांना तिकीट काढण्यापासून परावृत्त करून लगाला. Pune Crime फिर्यादींनी बस थांबवून त्याला खाली उतरण्यास सांगितले. दरम्यान, त्याचा राग आरोपीला आला. त्यातूनच त्याने खिशातून चाकू काढून फिर्यादींच्या मांडीत मारला. जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला. फिर्यादी महिलेचे साथीदारांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.