Pune Crime : हेअर स्पा करताना तरूणीला किस करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Updated On:

पुणे – हेअर स्पा करताना एका तरुणीचा चुंबन घेऊन तीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हेअर आर्ट सलूनमध्ये घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सलूूनच्या कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हेअर आर्ट सलूनमध्ये एक 26 वर्षीय तरुणी हेअर स्पा करण्यासाठी आली होती. तेथील कर्मचारी मंदार साळुंखे याने तीला स्पा करण्यासाठी घेतले होते. यावेळी मानेची मसाज करत असताना आरोपीने तीच्या ओठांचे चुंबन घेतले, तसेच नको त्या ठिकाणी स्पर्श केला. संबंधीत तरुणी एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कांबळे करत आहेत.





