Pune Crime – बनावट सोन्याची बिस्कीटे देऊन अस्सल सोन्याची मोड घेत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दिलीप विश्र्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२,रा. जळकोट,जि.लातुर), अमोल बाबू गिरी (वय ३२ रा. अहमदपूर, जि. लातुर) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून १२ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दिलीप स्वामी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,त्याच्यावर विविध ठाण्यात अपहरण, फसवणूक असे गुन्हे दाखल आहेत. खंडणी विरोधी पथकाचे हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले हडपसर ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना स्वामी साथीदारासह साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोडवर चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्याला पकडल्यावर २४ जुलै २०२५ ला प्रेमळ विठ्ठल मंदीराजवळ वयस्कर महिलेला बनावट सोने देत अस्सल सोन्याची पोत लांबविली होती. झडतीत आरोपींच्या खिशात सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूनची दोन बिस्कीटे, एक बेन्टेक्सची साखळी मिळाली. आरोपींनी आणखी एका जेष्ठ महिलेला बनावट सोन्याची बिस्कीटे देऊन गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले होते. ही घटना कराडमध्ये घडली होती. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, पोलिस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात यांच्या पथकाने केली.