Pune News : घरफोडीच्या गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार आरोपीला अटक; स्वारगेट बसस्थानकातून गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
Pune News : घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने अटक केली आहे.

Pune News : घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने स्वारगेट बसस्थानक परिसरातून अटक केली. रोहित दीपक सातपुते (वय २१, रा. घोरपडे पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News)
पुणे शहरात पाहिजे आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू असताना, एक नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि संतोष टकले यांना रोहित सातपुते स्वारगेट बसस्थानक परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. (Pune News)
सातपुते हा पर्वती पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात (गुन्हा रजिस्टर क्रमांक २५१/२०२५) भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अंतर्गत पाहिजे आरोपी होता. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, तो अभिलेखावरील घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune News)
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक तेजस्वी पवार, शंकर नेवसे व पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी केली. (Pune News)
Pune News : शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; न्यायालयीन कामकाज ठप्प





