Pune Crime : घरफोडी करणारे सराईत ‘जेरबंद’; 8 गुन्ह्यांतील 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे  – घरफोडी करणार्‍या सराईतांना गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अटक केली.  त्यांच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस आणून 20 तोळे सोन्याचे दागिने, 14 किलो चांदी आणि रोख रक्कम असा 18 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त केला.

सचिन उर्फ राहुल राजु माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय 28), सारंग उर्फ सागर संजय टोळ (वय 25), आणि सनी महेशकुमार तनेजा (वय 31, तीघे सध्या रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, मुळ पंढरपूर जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईतांचे नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोणीकंद ते फुलगांव रोड वढू खूर्द फाटा या रस्त्यावर सराईत गुन्हेगार सचिन माने हा साथीदारासह वाहन तसेच पादचार्‍यांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 मधील कर्मचार्‍यांना मिळाली.?त्यानुसार सहायक निरीक्षक नरेंंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे यांच्या पथकाने सापळा रचला आणि सचिन मानेसह सारंग आणि सनी तीघांना पकडले.

यावेळी त्यांचे दोन साथीदार अंधाराचा गैरफायदा घेत तेथून पसार झाले. पोलिसांनी मोटारीसह, कोयता, चाकू, दोरी, मिरची पूड आदी 3 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडे केलेल्या तपासात लोणीकंद 2, लोणी काळभोर, कोंढवा, वानवडी, सिंहगड रोड, येरवडा आणि चिपळूण पोलीस ठाणे प्रत्येकी 1 असे एकुण 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आणि त्यांच्याकडून  18 लाख 10 हजार 700 रूपयांच ऐवज जप्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.