पुणे क्राईम: रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ऍट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा

पुणे – रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ऍट्रोसिटी, फसवणूक व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडे घरकामाला असलेल्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजयसिंग शहाजी दडस(40, रा.संगमपार्क, रेल्वे वसाहत, बंडगार्डन) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दडस हे रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महिला व तीचे पती 2019 पासून सरकारी निवासस्थानाच्या आऊट हाऊसमध्ये राहून दडस यांच्याकडे घरकाम करतात. दडस यांनी फिर्यादीच्या पतीला रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या पतीने दिड लाख रुपये दिले होते. यानंतरही दडस यांनी त्यांच्या पतीला नोकरी लावली नाही.

पती-पत्नी दोघांनीही दडस यांच्याकडे दिलेले पैसे परत मागितले. मात्र ते नेहमी टाळाटाळ करत होते. फिर्यादी हे अनुसूचीत जाती जमातीचे असल्याचे माहित असूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होते. यानंतर एके दिवशी दडस यांनी फिर्यादीला शरीरसुखाची मागरी करत जबरदस्तीने किचेनमधून बेडरुममध्ये ओढत नेले. तेथे बेडवर पाडून विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारी करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.