Pune Crime : स्वतःला ईश्वर म्हणवणाऱ्या राधामोहन मिश्रासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Crime: स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा (वय ५९) याच्यासह अन्य सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime : खराडी – स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा (वय ५९) याच्यासह अन्य सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ ते २०२६ या कालावधीत हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र तसेच पुण्यातील वडगावशेरी आणि उबाळेनगर, खराडी येथील माऊली सदन परिसरात आरोपी राधामोहन मिश्रा वास्तव्यास होता. या काळात त्याने स्वतःला ईश्वर असल्याचे सांगून फिर्यादी महिला व तिच्या कुटुंबीयांना प्रभावित केले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच मारहाण, शिवीगाळ करून अमानुष वागणूक दिली. याशिवाय अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा (रा. माऊली सदन, गट क्र. १३४४/७, रेणुका पार्क, आरव अॅम्बियसजवळ, उबाळेनगर, खराडी, पुणे) याच्यासह अन्य सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास खराडी पोलीस करत आहेत.





