Pune Crime: 16 वर्षीय मुलास बेदम मारहाण, नग्न करत व्हिडीओ काढून साेशल मीडियावर केला व्हायरल, गुन्हा दाखल

पुणे – पुणे शहरातील डेक्कन परिसरात झेड ब्रीज खाली नदीपात्रात एका १६ वर्षीय मुलास कमरेच्या ब्लेटने व लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन त्यास जखमी करण्यात आले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला नग्न करुन त्याचे माेबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप तयार करुन ती साेशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी अन्सु शर्मा (१९,रा.मंडई, पुणे) व त्याचे तीन साथीदार यांचेवर डेक्कन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित मुलाच्या ३७ वर्षीय आईने पाेलीसांकडे तक्रार दाख केली आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा याचा मित्र अन्सु शर्मा व त्याचे तीन अनाेळखी साथीदार यांनी अन्सुला मारहाण करण्यासाठी तक्रारदार यांच्या मुलाने मुले पाठवल्याचा समज करुन घेतला. त्याकारणावरुन तक्रारदार यांचे मुलास कमरेच्या ब्लेटने व लाकडी बांबुने बेदम मारहाण करुन जखमी करण्यात आले. त्यानंतर सदर मुलाचे कपडे काढून त्यास नग्न करुन त्यांचे माेबाईलमध्ये व्हिडिओ क्लीप तयार करुन ती इन्स्टाग्रामवर पाठवून व्हायरल केली. त्याचप्रमाणे याबाबत पाेलीसात तक्रार दिली तर, समाजाचे ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आराेपींनी दिली. याबाबत पुढील तपास डेक्कन पाेलीस करत आहे.





