पुणे- शहरात दिवसभरात 182 नव्याने करोना बाधित आढळले. तर, 216 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 6 जण पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 30 लाख 45 हजार 891 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4 लाख 91 हजार 444 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 4 लाख 80 हजार 424 जण बरे झाले आहेत. मात्र आजपर्यंत 8 हजार 874 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत बाधितांमधील 2 हजार 146 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 208 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच 249 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात 9 हजार 668 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.