पुणे- शहरात गेल्या 24 तासांत 266 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, 215 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पाच आणि पुणे हद्दीबाहेरील 8 अशा 13 जणांचा झाला.
आतापर्यंत 4 लाख 91 हजार 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 4 लाख 80 हजार 89 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत बाधित असलेल्या रुग्णांमधील 2 हजार 56 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 202 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 261 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान दिवसभरात 9, 604 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.