Pune: कात्रजमध्ये दोन पीएमपीएल बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
Updated On:

पुणे – कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीएल बस रस्त्याच्या बाजूला चिखलामध्यये अडकून बंद पडलेले होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कात्रज आगारातील कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
गणेश गुजर (वय ३२ रा. कोथरूड, मुळ गाव भोर) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. गुजर हे कंत्राटी मॅकनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते.( MH 12 TV 0331 ) कात्रज हिंजवाडी बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या पीएमपीएल बस (MH 14 HU 5992 ) द्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते. त्यादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणचा पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहे.





