Pune Congress protest: पुण्यात राजभवनावर काँग्रेसचा हल्लाबोल! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दाखवले काळे झेंडे
Pune Congress protest: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे राजभवनाबाहेर काळे झेंडे दाखवून आंदोलन.

Pune Congress protest – नीट पेपरफुटीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राजभवन येथे काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. नवी दिल्ली येथे सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात नीट परीक्षा पेपरफुटीसंदर्भात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुमारे तीन आठवडे शांततामय आंदोलन करणाऱ्या लाखो तरुण विद्यार्थ्यांवर मोदी सरकारने अश्रूधूर आणि लाठीहल्ला करून जी क्रूरता दाखवली, त्याचा दीप्ती चवधरी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
सरकार भ्रष्टमुक्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र, त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेपरफुटी, राम मंदिरातील दानपेटीतून १४०० कोटी रुपये चोरीला जाणे हे या सरकारचे अपयश आहे. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. नीटचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.
या आंदोलनात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक रफिक शेख, अविनाश साळवे, साहिल केदारी, विशाल मलके, अविनाश बागवे, अमीर शेख, मेहबूब नदाफ, भाऊसाहेब आजबे, सतीश पवार, जीवन चाकणकर, संजय मोरे, द. स. पोळेकर, दत्ता जाधव, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, रवींद्र माझीरे, राजू ठोंबरे, स्वप्निल नाईक, रोहित साळवी, कुणाल राजगुरू,
राहुल वंजारी, हर्षद हांडे, विक्रम शहाणे, हेरॉल्ड मॅसी, अविनाश अडसूळ, वैभव डांगमाळी, देविदास लोणकर, विल्सन मॅसी, लता राजगुरू, नीता रजपूत, शिवानी माने, प्रियंका रणपिसे, सारिका मुंडावरे, सीमा सावंत, प्रियंका मधाळे, सुंदर ओव्हाळ, अभिजीत गोरे, अक्षय कांबळे, पवन खरात, सिद्धांत जांभूळकर, अनिकेत गावडे, कृष्णा साठे, सुष्मिता हरणे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.






