Pune: कात्रज परिसरामध्ये स्वच्छता अभियान

कात्रज – चर्च ऑफ गॉडच्या ६०व्या वर्धापन दिवस व पर्यावरण दिवसाच्या निमित्त वर्ल्ड मिशन सोसायटीचे प्रधान पादरी किम ज्यू चियल यांनी कात्रज परिसरामध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत प्लस्टिक संकलनचे अभियान आयोजित केले होते. यामध्ये चर्च ऑफ गॉडचे सुमारे १५० सदस्यांनी सहभाग घेतला. हे स्वच्छता अभियान जागतिक स्तरावर २०० देशांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
कात्रज परिसरामध्ये गुगळे प्लॉट, कात्रज चौक, जैन मंदिर, सातारा रोड, कात्रज तलाव आणि अशा विविध ठिकाणी स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. कात्रज परिसरातील पाणी बॉटल, स्ट्रॉ, कप, प्लस्टिक , कॅरी बॅग आणि खाद्य पदार्थांसह तीन टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला. प्लस्टिकचा अतिवापर व कचऱ्यामुळे पर्यावरणावर व जैवविविधतेवर होणारे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन करण्यात आले.
यावेळी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाआयुक्त राजेश गुर्रम यांनी प्लस्टिकचा वापर करणे टाळावे. कचरा अस्ताव्यस्त फेकू नये व शहर स्वच्छ ठेवावे , असे आवाहन केले. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ, निक्सन जॉन, चर्च ऑफ गॉडचे स्वयंसेवक, प्रवीण पाटोळे उपस्थित होते.





