Pune : गणेशोत्सवामुळे पीएमपीच्या बसमार्गात बदल; संध्याकाळी ५ नंतर वाहतूक वळवणार

पुणे – दरवर्षी गणेशोत्सवात वाढणाऱ्या गर्दीमुळे यावर्षीही संध्याकाळनंतर अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. त्याचा थेट परिणाम पीएमपीच्या बससेवेवरदेखील होणार असून काही मार्गांवरील बससेवा पर्यायी मार्ग चालणार आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरच्या काळात संध्याकाळी ५ नंतर पीएमपीच्या वाहतुकीत होणारे बदल पुढीलप्रमाणे असणार आहेत.
शिवाजी रस्ता बंद झाल्यानंतर या मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्या जंगली महाराज रोड – बालगंधर्व – डेक्कन – संभाजी पूल – टिळक रोड – स्वारगेट असा प्रवास करत पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. तर टिळक रोड वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गावरील बसेस शास्त्री रोड – दांडेकर पूल – मित्र मंडळ चौक – लक्ष्मी नारायण चौक असा प्रवास करत पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बसेस बाजीराव रोडवरील वाहतूक बंद होईपर्यंत कोणताही बदल नाही.
तसेच, पुणे रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या गाड्या मध्यवर्ती रस्ते बंद झाल्यानंतर ससून हॉस्पिटल – मालधक्का – जुना बाजार – म.न.पा. भवन बस स्थानक – काँगेस भवन – बालगंधर्व – डेक्कन बस स्थानक – खंडुजी बाबा चौकातून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. तर लक्ष्मी रस्ता बंद झाल्यानंतर एनडीए आणि कोंढवा गेटकडे जाणाऱ्या बसेस मॉडर्न बेकरी चौक – सेव्हन लव्हज चौक – स्वारगेट चौक – टिळक रोड – डेक्कन कॉर्नरवरून नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
तर तिथून माघारी येणाऱ्या गाड्या केळकर रोड – अ.ब.चौक – देवजी बाबा मंदिर चौक – गुरूद्वारा रस्ता – हमजे खान चौक मार्गे नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.
दुसरीकडे गणपती माथा किंवा कर्वेनगर दिशेने येणाऱ्या गाड्या म्हात्रेपूल – स्वारगेट – शंकरशेठ रोड – सेव्हन लव्हज – रामोशीगेट – भवानीमाता मंदिर – म. गांधी स्थानकातून नेहमीच्या मार्गाने बसेस जातील. तर एनडीए गेटवरून येणाऱ्या गाड्या भवानीमाता मंदिर रस्ता बंद झाल्यानंतर गोळीबार मैदान – म. गांधी स्थानक मार्गे बस पुढील जातील.
तर शास्त्री रोड बंद झाल्यावर त्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या दांडेकर पूल – सेनादत्त पोलीस चौकी – म्हात्रे पूल – पुढे कर्वेरोड – डेक्कन मार्गे जातील. टिळकरोड वाहतुकीकरिता बंद झाल्यानंतर त्यावरून जाणाऱ्या गाड्या शास्त्रीरोड मार्गे दांडेकर पूलवरून संचलनात राहतील.





