Pune Lok Sabha Election 2024 | राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होत आहे. मात्र या दरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडतात. असाच प्रकार काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबत घडला आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान करण्यात आले आहे. खुद्द अरविंद शिंदे यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. Pune Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघातही बोगस मतदान परंतु तरीही अरविंद शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी देण्यात आली. मात्र असे झाले असले तरी त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते. दुसरीकडे, शिरुर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात हुतात्मा राजगुरू शाळेत एका मतदाराच्या नावापुढे आधीच सही असल्याने बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. Pune Lok Sabha Election 2024 |