Pune : मागणी कमी असल्यामुळे डाळी-कडधान्याच्या दरात मोठी घसरण

पुणे : आयात खाद्यतेलावरील शुल्क कमी केल्यामुळे शेंगदाणा तेल वगळता सर्वच खाद्यतेलांच्या दरात १५ किलो तर लिटरमागे २० ते २५ रुपयांनी तर वनस्पती तुपाच्या दरात १०० रुपयांनी घट झाली. मात्र, तुटवड्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात १५ किलोमागे आणखी एक हजार रुपयांची दरवाढ झाली. आवक मुबलक प्रमाणात होत असली तरी मागणी कमी असल्यामुळे डाळी कडधान्यांचे दर मंदीतच आहेत.
गेल्या आठवड्यातही बहुतांशी डाळी कडधान्यांच्या दरात घट झाली. मूग आणि मूगडाळीच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी तर भारी चवळी दरात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. मध्य प्रदेशात उन्हाळी मुगाची आवक सुरू झाली आहे. सध्या एकूणच डाळी कडधान्य बाजारावर मंदीचा मोठा प्रभाव आहे. भाव कमी असले तरी मागणी कमी असल्यामुळे मूग आणि मूगडाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात मूग आणि मूगडाळ दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घट झाली.
गुजरातमध्ये यंदा भारी प्रतीच्या चवळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, भावात मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे सुमारे दोन हजार रुपयांची घसरण झाली. मागणीअभावी तूरडाळ, मूगडाळ आणि हिरव्या वाटाण्याचे दरही मंदीतच असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत म्यानमार येथून तुरीची मोठ्या प्रमाणात आयात अपेक्षित आहे. यामुळे तूरडाळीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर स्थिर होते. केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कच्चा खाद्यतेलांवरील आयातशुल्क दहा टक्क्यांनी कमी केल्यामुळे खाद्यतेल बाजारात मंदीचे वातावरण आहे. कमी आयात शुल्क भरलेल्या खाद्यतेलाची आवक सुरू झाल्यानंतर मोठी घट अपेक्षित असल्याने मागणी कमी आहे.
यामुळे शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात गेल्या आठवड्यात १५ किलो/लिटरच्या डब्यामागे २० ते २५ रुपयांनी घट झाली. वनस्पती तुपाच्या दरात मात्र शंभर रुपयांनी घट झाली. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर होते. मात्र, खोबऱ्याच्या तुटवड्यामुळे खोबरेल तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारात खोबरेल तेलाची तुरळक प्रमाणात आवक होत आहे. गेल्या आठवड्यातही दरात ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आणि १५ किलोच्या डब्याचा दर ५५०० ते ५७०० रुपयांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा विक्रमी दर मानण्यात येत आहे.
सध्या बाजारात साखरेस मागणी कमी असल्याने दर मंदीतच आहेत. उत्पादन थंडावल्याने बाजारात गुळाची आवक मंदावली आहे. मात्र, मागणी चांगली आहे. यामुळे गुळाचे दर तेजीतच असल्याचे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) ४०५०-४१०० रु.
खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २३००-२४००, रिफाईंड तेल २१००-२७५०, सरकी तेल १९२०-२२५०, सोयाबीन तेल १८५०-२१००, पामतेल १८७५-२०२५, सूर्यफूल रिफाईंड तेल १९००- २१००, वनस्पती तूप १९००-२२००, खोबरेल तेल ५७००-६००० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसूरी ४५००-५०००, एच.एम.टी. कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१)-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००-९५००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९)-८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु. गहू- लोकवन नं. १ ४०००-४२००, लोकवन नं. २ ३६००-४०००, नं.३ ३३००-३६००, सिहोर नं. १ ५७००-६०००, सिहोरी ३८००-४४००, मिलबर – २९००-३००० रु.
ज्वारी :-गावरान नं. १ ५५००-५८००, गावरान नं.२ ४८००-५०००, नं.३ ३५००-३८००, दूरी नं.१ ३६००-४०००, दूरीनं.२ ३२००-३५०० रु बाजरी:-महिको नं.१ ३७००-३८००, महिको नं.२ ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु. गूळ:- गूळ नं.१ ४४००-४५००, गूळ नं.२ ४३००-४३७५ गूळ नं.३ ४२००-४२५०, बॉक्स पॅकिंग ४३००-५५०० रु.
डाळी :- तूरडाळ ९०००-१०५००, हरभराडाळ ७०००-७१००, मूगडाळ ८८००-९०००, मसूरडाळ ७५००- ७६००, मटकीडाळ ७८००-८०००, उडीदडाळ ९०००-१०००० रु. कडधान्ये:-हरभरा ६२००-६४००, हुलगा-५५००-५६०० चवळी ७०००-१००००, मसूर ७०००-७२००, मूग ८८००-९०००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००-६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम १५०००, वाटाणा हिरवा १००००- ११०००, वाटाणा पांढरा ४२००-४३००, काबुली चणा ७०००-१०००० रु.
साबुदाणा:-साबुदाणा नं.१ ५५००, साबुदाणा नं.२५०००, साबुदाणा नं.३ ४८०० रु. वरई भगर :-१००००, सावा भगर ९५००, गोटा खोबरे २४००-२६०० रु. शेंगदाणा :- जाडा ८१००-८७५०, स्पॅनिश–१०७००, घुंगरु ९०००-९१०० टीजे ७५००रु.
धने:- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५०००रु. पोहे :- मध्य प्रदेश ४९००-५१००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४८००-५२००, दगडी पोहा ४८००- ५२००, पातळ पोहा ५६००-६२००, सुपर पोहा ५३००-५७००, भाजका पोहा ६२५-७२५, मका पोहा ६००-७२५, भाजके डाळे ३३००-३९००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५५०-५७०, भडंग ८००-१११०,
घोटी ५३०-५४०रु. रवा, मैदा, आटा- (५०किलोचा भाव) आटा १७००-१७५०, रवा १७५०-१८००, मैदा १७५०-१८००, बेसन:- (५०किलोस) ४१५०-४४०० रु. मीठ :- मीठ खडे (५०किलोस) २७५, मीठ दळलेले (५०किलोस) ३००-३२५ रु. मिरची:-काश्मीरी ढब्बी २५०००-३००००, ब्याडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००, गुंटूर १४०००-१५०००, खुडवा गुंटूर७०००-८०००, खुडवा ब्याडगी ८०००-९००० रु. नारळ :- (शेकड्याचा भाव) : नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ४२००-४५००, पालकोल जुना २२००- २३००, सापसोल ४२००-४५०० रु.




