Pune: हडपसरमधील लाडक्या बहिणी चेतन तुपे यांच्या पाठीशी…

हडपसर – महिलांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या आरोग्याची सदैव काळजी घेणाऱ्या आमदार चेतन तुपे यांच्या पाठीशी हडपसर मतदारसंघातील लाडक्या बहिणी भक्कमपणे उभ्या असल्याचा विश्वास माजी महापौर वैशाली बनकर व माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी व्यक्त केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघर संपर्क साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच आरपीआय व इतर मित्र पक्षाच्या महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या या प्रचार करीत आहेत.
राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या की, आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकारातून हडपसर मतदारसंघातील हजारों महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. माजी नगरसेविका रंजना टिळेकर म्हणाल्या की, सरकारने लेक लाडकी योजनाही सुरू केली आहे.
त्या योजनेतून मुलीला अठरा वर्षांची झाल्यानंतर एक लाख रुपये मिळतील. माजी नगरसेविका नंदाताई लोणकर म्हणाल्या की, एसटी बस प्रवासासाठी 50 टक्के सवलतीचा महिलांना फायदा होत आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे.





